कुडाळमध्ये विद्युत पोलवर काम करत असताना शॉक लागून वायरमन गंभीर

⚡कुडाळ ता.२१-: कुडाळ शहरातील गवळदेव जवळील अभिमन्यू हॉटेल समोरील आज सकाळी वीज वितरण कंपनीच्या पोलवर काम करीत असताना कंपनीचा कर्मचारी धनंजय फाले (सध्या रा. पिंगुळी शेटकरवाडी, मूळ रा. महादेवाचे केरवडे) हा विजेचा तीव्र धक्का लागून पोलवरच चिकटून राहिला. सुदैवाने त्यानंतर वीजपुरवठा बंद करण्यात आला. वीजवितरणचे कर्मचारी, एमआयडीसी अग्नीशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर त्याला पोलवरुन सुरक्षित खाली उतरविण्यात आले. तसेच तातडीने वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे नेण्यात आले.


या अपघातात वायरमन धनंजय फाले हा गंभीर जखमी झाला असून दुर्दैवीरित्या भाजलाही आहे . आज शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. वीजवितरणकडे कोणतीही आपत्कालीन व्यवस्था नसल्याने वायरमन फाले यांच्यावर पाऊण तास पोलवर लोंबकळत राहिले.

You cannot copy content of this page