रुपेश राऊळ यांची टीका: कबुलायतदार प्रश्न अर्धाच सुटला सांगून केसरकारांचा जनतेवर थंड दहशतवाद..
सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी तालुक्यात पूर परिस्थिती असताना जनतेने निवडून दिलेले स्थानिक आमदार मंत्री दीपक केसरकर हे वॉन्टेड असून जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे आता या ठिकाणी वालीच कोण नसल्याने येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही अशी टीका ठाकरे गटाचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केली.
दरम्यान कबुलायतदार गावकर प्रश्नावरून काहींनी पेढे वाटले काहींनी सत्कार करून घेतला मात्र सत्काराला जनता उपस्थित न राहिल्याने दडपशाही म्हणून त्यांनी वनविभागाचा मुद्दा पुढे करत प्रश्न अर्ध्यात सुटल्याचं थंड दहशतवाद भासवला अशी टीका त्यांनी यावेळी केली. ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषद बोलत होते.
यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, माजगाव ग्रामपंचायत सरपंच आबा सावंत, आदि पदाधिकारी उपस्थित होते
