एन.पी.मठकर यांची देशपातळीवरील पुरस्कारासाठी निवड

⚡वेंगुर्ला ता.२१-: ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अॅडव्होकेट अॅण्ड असोसिएशन दिल्लीतर्फे देशातील देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले असून यात वेंगुर्ला तालुक्यातील मठ-सिद्धार्थनगरचे सुपुत्र एन.पी.मठकर यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

मठकर हे सिधुदुर्ग ओरोस न्यायालयातून ३७ वर्ष ९ महिने उत्कृष्ट न्यायालयीन सेवा पूर्ण करून अधिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.
न्यायालयीन सेवेत असताना मठकर यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटना, न्यायालयीन कर्मचारी संघटना, बहुजन हिताय न्यायालयीन कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य औरंगाबाद कार्यालय परभणी, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा सिधुदुर्ग अशा विविध कर्मचारी संघटनेवर पदाधिकारी म्हणून काम केलेले आहे. आपल्या मातोश्रींच्या नावे कै.सो.रुक्मिणी फटू मठकर ट्रस्टची स्थापना करून विविध सामाजिक उपक्रम ट्रस्टमार्फत राबवित आहेत. दि.२८ जुलै रोजी सकाळी १० वाजता आयार्च अत्रे सभागृह कल्याण (पश्चिम) येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
फोटो – एन.पी.मठकर

You cannot copy content of this page