राहत्या घराची भिंत कोसळून ८० हजारचे नुकसान…

बांदा येथील घटना: तलाठीकडून पंचनामा

⚡बांदा ता.२१-: बांदा शहरातील उभाबाजार येथील सुदन भास्कर वाळके यांची राहत्या घराची मातीची भिंत मुसळधार पावसाने आज सकाळी कोसळली. वाळके यांचे ८० हजार रुपये नुकसान झाले. तलाठी फिरोज खान यांनी नुकसानीचा पंचनामा केला.

उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्या श्रेया केसरकर, शैलेश केसरकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्ताना महसूल प्रशासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी उपसरपंच खतीब यांनी केली.

You cannot copy content of this page