अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द

⚡कुडाळ ता.२१-: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार त्यांच्या वाढदिवसानिमित्तचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम रद्द करत असल्याचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

दोन दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील ग्रामस्थांवर दरड कोसळून मोठी आपत्ती ओढावलेली होती. यामध्ये काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. तर कधी न भरून येणारी हानी सुद्धा झाली आहे. या सर्व आमच्या बांधवांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. त्यांच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळला असताना आपला वाढदिवस बॅनर जाहिराती हार-तुरे यांनी साजरा न करता त्यासाठी येणारा खर्च हा इर्शाळवाडीतल्या ग्रामस्थांच्या मदतीसाठी द्यावा असा आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्या आवाहनाला अनुसरून आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमच्या नेत्याचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करणार आहोत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की त्यांनी कोणतीही बॅनरबाजी न करता कोणत्याही प्रकारचं प्रदर्शन न करता साजरा करावा. जी काही होईल ती मदत आपल्या नेत्यांमार्फत इर्शाळवाडीतील ग्रामस्थांकडे पोहोचवावि असे आवाहन अबिद नाईक आणि काका कुडाळकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page