निगुडेतील ग्रामस्थांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना

⚡बांदा ता.२१-: सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून निगुडे पाटीलवाडीतील तीन राहत्या घरांत पुराचे पाणी शिरले. तर पाटीलवाडीकडे जाणारा मार्ग काही काळ पूर्णपणे बंद होता. स्ट्रीट लाईटचे तीन विद्युत खांबही कोसळले अन रस्त्यावर अंधार पडला होता. तलाठी प्रणिता गव्हाणकर व वायरमन श्री. कुडव यांनी पाहणी केली व ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना केल्या.

यावेळी दयानंद पाटील, श्यामसुंदर पाटील, नंदकिशोर पाटील, दशरथ पाटील, सिराजउद्दीन हेरेकर,  माजी सरपंच शावियर फर्नांडिस, मार्शल गुडीनो, बेझमी गुडीनो, अरुण शेगडे, आदींच्या घराची नुकसानीबाबत विचारपूस केली. निगुडे पाटीलवाडी स्ट्रीट लाईटचे तीन खांब वादळी वाऱ्यापावसामुळे जमीनदोस्त झाले.

यावेळी निगुडे उपसरपंच गौतम  जाधव, माजी उपसरपंच गुरूदास गवंडे, विद्युत वायरमन श्री कुडव, ग्रामपंचायत कर्मचारी लहू जाधव आदींनी पाहणी केली. सविस्तर अहवाल सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना सादर केला जाईल असे निगुडे तलाठी यांनी सांगितले. तसेच पुराच्या पार्श्वभूमीवर आपण सतर्क रहा अशा सूचनाही तलाठी प्रणिता गव्हाणकर यांनी दिल्या.

दरम्यान, मुंबई गोवा महामार्गालगत भराव टाकल्यामुळे पाणी जाण्याचे नैसर्गिक स्त्रोत्र होते ते बंद झाल्यामुळे हा फटका निगुडेवासीयांना बसत आहे असे निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page