घाडीगांवकर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 30 जुलै रोजी सत्कार

⚡कणकवली ता.२१-: क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई , सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने रविवार ३० जुलै २०२३ रोजी कणकवली येथे इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झालेल्या घाडीगांवकर समाजातील गुणवंत विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी परीक्षेत ७५ % पेक्षा अधिक किंवा इयत्ता १२ वी परीक्षेत ६० % पेक्षा अधिक गुण मिळाले असतील , त्यांनी आपली नावे समाजाच्या व्हाट्सअप ग्रुपवर पाठवावीत. तसेच ५ वी व ८ वी स्कॉलरशिप प्राप्त यादीतील विद्यार्थी, नवोदय निवड यादीतील विद्यार्थी, इंजिनिअरिंग, मेडिकल, बी. फार्मसी पास विद्यार्थ्यांनी आपले डिटेल्स व्हाट्सअप ग्रुपवर पाठवावे. असे आवाहन घाडीगांवकर समाज संस्थेतर्फे करण्यात आले आहे . कार्यक्रमाला येताना मार्कलिस्टची झेरॉक्स कॉपी घेऊन येणे.
कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ – मातोश्री मंगल कार्यालय, मुंबई -गोवा हायवे, नवरे हॉस्पिटल समोर, कणकवली. (सकाळी ठीक – १०.०० वाजता ) असे आहे . अधिक माहितीसाठी सूर्यकांत घाडी- 9422967374, प्रदीप घाडी – 9757174528, बुधाजी घाडीगांवकर – 9420216562 , विजय गांवकर – 9422434532, यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page