रोटरी क्लब मालवण तर्फे तीनशे पुस्तके प्रदान…

*💫मालवण दि.०१-:* रोटरी क्लब मालवण तर्फे तीनशे इंग्रजी पुस्तके मालवण मधील नगर वाचन मंदिर, स .का.पाटील महाविद्यालय, भरतगड इंग्लिश स्कूल यांना ₹ वितरीत करण्यात आली. ही इंग्रजी पुस्तके बेंगलोर ऑर्चर्ड क्लबचे माजी अध्यक्ष रोटेरियन रवी शंकर डाकोजि यांच्यामार्फत अमेरिकेहून मागवण्यात आली होती. यावेळी रोटरी क्लबचे रोटेरियन डॉ. अजित लिमये, रोटेरियन श्रीनिवास हडकर, महेश काळसेकर, प्रा. अनिल देसाई, डॉ. लीना लिमये आदी उपस्थित होते. मुलांमध्ये व नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हा यामागचा मुख्य हेतू आहे, असे यावेळी रोटरीच्या सदस्यांनी सांगितले. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. पवार, मदतनीस श्री. अटक, नगर वाचन मंदिरचे प्रकाश कुशे, भरतगड इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी लोकरे- खोत यांनी स्वीकारली.

You cannot copy content of this page