_नागरिकांनी सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड लसीकरण करावे- डॉ.महेश खलिफे…..

कणकवली येथील संजीवनी संजीवनी हॉस्पिटल मध्ये कोरोना लसीकरणाचा शुभारंभ.

*💫कणकवली दि.०१-:* सिंधुदिर्ग जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांमध्ये सात ठिकाणी व शासकीय जिल्हा रुग्णालय येथे अशा आठ ठिकाणी कोविड लसीकरण कक्षांचा शुभारंभ करण्यात येत आहे. कणकवलीत चार खाजगी रुग्णालयांमध्ये प्रत्येकी अडीचशे रुपये देऊन कोविड लस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. दर दिवशी सरासरी शंभर नागरिकांना लसीकरण करण्यात येईल.त्यामुळे वयाच्या साठ वर्षावरील नागरिकांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे.तसेच ४५ ते ६० वर्षातील नागरिकांना त्या २० आजारपैकी आजार असेल तर त्यालाही लसीकरण करता येईल अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश कदम यांनी या कार्यक्रमात दिली. कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटल कोरोना लसीकरण कक्षाचे डॉक्टर महेश खलीफे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला. कणकवली येथील डॉक्टर विद्याधर तायशेटे यांच्या संजीवनी हॉस्पिटल मध्ये कोविड १९ लसीकरणाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पोळ,डॉ.प्रियंका खरे, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे,डॉ.निलेश कोदे,व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, नगरसेविका कविता राणे,किशोर राणे,वर्षा बांदेकर,प्रशांत मांजरेकर, जनार्दन गोसावी,समूह संघटक निखिल जाधव,जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक रवींद्र जोशी,मिथाली मालवणकर,आरोग्य सेविका श्रीमती मुसळे,अविनाश राणे,शरद सुतार,प्रकाश सापळे, गोविंद चव्हाण, अनुष्का घाडीगांवकर, मानसी खोचरे,गौरी घाडी, पूजा जाधव व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे म्हणाले, कोरोना महामारी डॉक्टर विद्याधर तायशेटे,आणि त्यांच्या टीमने चांगले काम केले आहे. त्याचबरोबर तालुका आरोग्य विभागाने अहोरात्र मेहनत घेतली आता कोविड लसीकरण नागरिकांना दिले जात आहे. त्याचा शुभारंभ संजीवनी हॉस्पिटल मध्ये होताना आम्हाला सर्वांना आनंद होत आहे. या ठिकाणी नागरिकांनी ॲप मध्ये नोंदणी करावी किंवा त्या ठिकाणी आधार कार्ड देऊन शासकीय निकषानुसार नाव नोंदणी करावी आणि घाई गडबड न करता किंवा गर्दी न करता या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

You cannot copy content of this page