जिलेटीन स्फोटात परप्रांतीय कामगार जखमी झाल्याप्रकरणाची सखोल चौकशी करा

भाजपा ची महसूल व पोलीस प्रशासनाकडे मागणी

*💫दोडामार्ग दि०१-:* दोडामार्ग तालुक्यात सुरू असलेल्या काळ्या व जांभ्या दगडाचे उत्खनन राजरोसपणे सुरू आहे. यामधील एका क्वांरीवर काल जिलेटिनचा स्फोट होऊन दोन परप्रांतीय कामगारांना इजा झाल्याचा संशय असून त्यांना दवाखान्यात न आणता मणेरी येथे रस्त्याच्या कडेला आणून फेकून दिले. हा प्रकार निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणारा असून ही गोष्ट क्वांरीं मालकानेच केल्याचा दाट संशय असून यावर सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी दोडामार्ग भाजपा तर्फे पोलीस निरीक्षक दोडामार्ग व तहसीलदार अरुण खानोलकर यांच्याकडे करण्यात आली. सदर उपचारासाठी दाखल केलेल्या कामगारांकडून जिलेटिनचा स्फोट हा भेडशी परिसरातील एका क्वारीवर झालेला असून आपल्याला क्वारी मालकाने मणेरी येथे सोडल्याचे ग्रामस्थांना सांगितले. त्यामुळे या कामगारांना ते आपल्याकडे काम करत नाहीत असे भासविण्यासाठी त्यांना मणेरी येथे सोडल्याची शक्यता नाकारता येत नाही सदर ही घटना तालुक्यातील एका क्रशरवर घडल्याची चर्चा असून त्या दृष्टीने तपास होणे गरजेचे आहे असेही या निवेदनात म्हटले आहे. परिणामी संबंधित घटना घडली त्या क्वारीचा क्वारीमालक, त्या क्वारीसाठी स्फोटके पुरविणारी यंत्रणा, जखमी परप्रांतीय कामगारांचा मुकादम तसेच स्फोट झाल्यानंतर त्या ठिकाणाहून कामगारांना मणेरी येथे फेकून पळ काढणारा संबंधित वाहन चालक याचेवरही गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. सदर प्रकरणाची घटनास्थिती पाहता राजकीय किंवा इतर दबावापोटी घटनेचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामुळे योग्य तापासणीअंती वरील सर्वांवर गुन्हे दाखल न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून भारतीय जनता पार्टी दोडामार्ग यांनी दिला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष प्रविण गवस,माजी उपनगराध्यक्ष तथा भाजपा युवा मोर्चा उपजिल्हाध्यक्ष चेतन चव्हाण,प. स. सदस्य बाळा नाईक,राजेंद्र निंबाळकर, विठोबा पालयेकर, पांडुरंग बोर्डेकर, देवेंद्र शेटकर, राजेश फुलारी, समीर रेडकर, दिपक गवस, पराशर सावंत, सुनील गवस, चंद्रकांत गवस केशव रेडकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page