*शासनाच्या नियमांचे पालन करत आठवडा बाजार होणार

*नगराध्यक्ष संजू परब यांची माहिती

*💫सावंतवाडी दि.०१-:* वाढत्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी आठवडा बाजार उद्या होणार की नाही असा सम्रभ लोकांमध्ये निर्माण झाला आहे. परंतु या संभ्रमाला नगराध्यक्ष संजू परब यांनी पूर्णविराम दिला असून, आठवडा बाजार होणार असल्याचे संकेत दिले आहेत. परंतु या आठवडा बाजारावेळी कोरोना प्रतिबंधात्मक शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. मास्क, सोशल डिस्टन्स या सारख्या नियमांचे पालन करतच आठवडा बाजार भरवला जाणार आहे.

You cannot copy content of this page