*💫वेंगुर्ला दि.०१-:* वेंगुर्ला तालुक्याच्या विकासाकरीता लोकराज्य मंच ही सामाजिक संस्था सुरु करण्यात आली असून या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीनिवास गावडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर संस्थेच्या उपाध्यक्षपदी शिवराम आरोलकर, सचिवपदी राजेश परब यांची निवड करण्यात आली असून संस्थेच्या उर्वरित कार्यकारिणीत प्रांतपाल-आनंद मोचेमाडकर, सदस्य-डॉ. संजीव लिगवत, श्रेया मयेकर, मयुर आरोलकर, सुरेंद्र मळगावकर, शेखर चोपडेकर, जहीर शेख, प्राची तांडेल, दशरथ नाईक यांचा समावेश आहे. या संस्थेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष श्रीनिवास गावडे यांनी दिली.
लोकराज्य मंच अध्यक्षपदी डॉ. श्रीनिवास गावडे…
