कारीवडे पेडवेवाडीत सुमो पलटी होऊन अपघात

सकाळची घटना: सात प्रवासी किरकोळ जखमी

⚡सावंतवाडी ता.१५-: चालकाचा ताबा सुटल्याने सुमो पलटवून अपघात झालाय हा अपघात आज सकाळी कारीवडे- पेडवेवाडी येथे घडला असून यात सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाने ब्रेक मारल्याने गाडी पलटी झाली. संबंधित कुटुंब एका साखरपुडा कार्यक्रमानिमित्त सावंतवाडीत आले. होते.

You cannot copy content of this page