विरोधकांनाही सोबत घेऊन सिंधुदुर्गात राष्ट्रवादी मजबूत करणार…

अबिद नाईक:ज्यांच्यात क्रियाशिलताच नाही, त्यांच्याबाबत बोलणे योग्य नाही;नियुक्तीचा निर्णय सर्वसहमतीने

⚡कणकवली ता.१४-: विरोधकांनाही सोबत घेऊन सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठलेही गटातटाचे राजकारण होणार नाही.असे सांगतानाच
राष्ट्रवादी पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल कुडाळ तटकरे यांनी माझी जिल्हाध्यक्षपदी व काका कुडाळकर यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. हा नियुक्तीचा निर्णय सर्वसहमतीने झालेला असून जिल्ह्यात राष्ट्रवादी संघटना बळकट करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. यासाठी प्रत्येक तालुका व गावपातळीवर पक्ष संघटना मजबूतीसाठी काम केले जाणार आहे. तसेच सत्तेतील घटक पक्षांच्या नेतेमंडळीना विश्वासात घेऊन जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचे काम आम्ही करणार आहोत. ज्यांच्यात क्रियाशिलताच नाही, त्यांच्याबाबत बोलणे योग्य नसल्याचा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी हाणला.

कणकवली येथील हॉटेल साईपॅलेसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष काका कुडाळकर, माजी अध्यक्ष सुरेश गवस, प्रांतिक सदस्य उदय भोसले, प्रांतीक सदस्य सावळाराम अणावकर, तसेच विलास गांवकर, दिलीप वर्णे, सर्फराज नाईक, शैलेश लाड, राजू पावसकर, संकेत सावंत, वैभव रावराणे, अशोक पवार, बाबू सावंत, विलास पावसकर, राजू धारपवार, अस्लम खतिब, ॲड. हितेश कुडाळकर, सतीश पाताड, अनिस नाईक, अमित केतकर, प्रसाद कुलकर्णी व मनोहर मालंडकर इतर उपस्थित होते.


अबिद नाईक म्हणाले,पुढील काळात पक्षाचा मेळावा घेतला जाणार असून त्यावेळी मेळावे घेऊन टीका करणाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ येईल, असे सांगतानाच
राष्ट्रवादीचे कामकरत असताना कोणताही गट तट न ठेवता काम केले जाणार आहे. सर्वांना सोबत घेऊन काम केले जाणार आहे. ज्येष्ठांचेमार्गदर्शन घेत आठही तालुक्यांमध्ये पक्षसंघटना बांधणीसाठी लवकरच दौरेही आयोजित करण्यात येणार असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकास निधी आणला जाणार आहे. हे करत असताना घटक पक्ष भाजपा नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, मंत्री, उदय सामंत, आमदार नितेश राणे या सर्वांना विश्वासत घेऊन काम केलं जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्य जनतेच्या कामांसाठी हा निर्णय घेतला आहे. शरद पवार हे आमचे दैवत आहेत, गैसरमज नसावा. त्यांचेच विचार घेऊन आम्ही व आमचे वरिष्ठ नेतेमंडळी पुढे जात असल्याचेही श्री. नाईक यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून आम्ही निधी आणून विकास कामे पुर्ण केली. यापुढे या निधीसोबतच राज्य शासनाकडून अधिक निधी आणला जाईल. तसेच प्रत्येक तालुकावार नियोजन करून संघटना वाढीसाठी काम केले जाणार आहे. आपण गेली २५ वर्षे राजकारणात आहे. सर्वांना सोबत घेत काम केले जाईल. अजित पवार व सुनिल तटकरे यांनी आम्हाला नियुक्तीपत्र देताना तुम्ही काम सुरू करा, आम्ही पाठीशी आहोत, असा शब्द दिला आहे. त्यानुसार आम्ही काम सुरू करत असल्याचेही श्री. नाईक म्हणाले.

संघटनात्मकदृष्ट्या काम करत असताना कुणाचे गैरसमज असतील तर ते दूर करून काम केले जाईल. तसेच आम्ही सक्रिय समस्य नसल्याचे म्हणणाऱ्यांबबात आम्ही बोलणे उचित नाही. जे स्वत: क्रियाशिल नाहीत त्यांच्याबद्दल काय बोलणार? त्यांच्याकडे १८०० पुस्तके दिली, त्यातील २०० सभासद केले. आमच्याकडे २५० दिली ते महिनाभरात सर्व सभासद करून दिले, असेही श्री. नाईक म्हणाले.शरद पवार हे नेते आहेत जिल्ह्यात आले किंवा मी मुंबईला गेलो तरी मला भेट मिळेल.बॅनर वर पवार यांचे फोटो कायम राहील,असे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक असे सांगितले.

काका कुडाळकर म्हणाले,पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व इतर सर्व वरिष्ठ नेतेमंडळींनी आपल्यावर दिली आहे. श्री. नाईक यांच्यासोबत दोन मतदारसंघात पक्षसंघटना वाढीची जबाबदारी माझ्यावर आहे. तर कणकवली विधानसभा मतदारसंघातील जबाबदारी अबिद नाईक यांच्या वर आहे. आपण यापुर्वी केलेल्या कामाचा फायदा संघटना बांधणी केला जाईल. तळागाळात कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी पाहिले काम केलं जाईल. आपणाला जिल्हाध्यक्षपद मिळायला हवे होते, ही आपली अपेक्षा होती. पण पक्षाने दिलेले काम आपण करणार असून सर्व एकदिलाने काम करणार आहोत. पक्ष आपल्यावर जी जबाबदारी देईल, ती आपण पार पाडू, असे काका कुडाळकर म्हणाले. तसेच प्रफुल्ल सुद्रिकही आमच्यासोबतच आहेत, आज ते कामानिमित्त बाहेर असल्याचे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सोबत काम केल्याने अनेक पक्षात मित्र आहे.त्यामुळे मला काहींनी संपर्क साधला होता.मी कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही.मला आजही जिल्हाध्यक्ष पद मिळाले पाहिजे,ही भूमिका आहे.आमची भूमिका पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची भूमिका आहे.

You cannot copy content of this page