⚡ओरोस ता.१४-: राज्यात नव्याने स्थापन झालेल्या बळीराजा सेना जिल्हाध्यक्षपदी वासुदेव साळवी यांची नुकतीच झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निवड जाहीर केली आहे.
कोकणात राज्यात नव्याने स्थापन झालेल्या बळीराजा सेना राज्य कार्यकारिणीची सभा राज्याध्यक्ष अशोक बालम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी यावेळी राज्य उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, सरचिटणीस प्रकाश तराळ संभाजी काजरेकर, नंदकुमार मोहिते, कोषाध्यक्ष मनोहर पवार यासह पदाधिकारी उपस्थित होते .यावेळी झालेल्या बैठकीत बळीराजा सेना ही राजकीय दृष्ट्या महत्त्वाची अशी पक्ष संघटना असून महाराष्ट्रात त्याचा विस्तार करण्यासाठी जिल्हा जिल्हास्तरावर अध्यक्ष नियुक्त करण्यात आले मुंबई सह कोकणात उपनगरात आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हा जिल्ह्यात अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष पदासाठी वासुदेव साळवी यांची निवड केली असून लवकरच जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्यकारणी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ते दौरा करणार आहेत पक्ष्या पक्षातील वादविवाद आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी बळीराजा सेना ही पक्ष संघटना राजकीय दृष्ट्या जिल्ह्यात पक्ष बाधणी करणार असल्याचे वासुदेव साळवी यांनी बोलताना स्पष्ट केले [ सोबत फोटो
