*💫सावंतवाडी दि.०१-:* सहदेव राऊळ : मळगाव येथील आझाद मैदान येथे कोकण नटसम्राट लोकराजा तथा कलेश्वर दशावतार मंडळाचे मालक सुधीर कलींगण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोकण नटसम्राट दादा राणे-कोनसकर,बाळा कलींगण, विलास गवस, सिद्धेश कलींगण, आनंद गावकर, कृष्णा घाटकर, नीलकंठ सावंत, सुधीर राऊळ, नागेश मळगावकर व कलेश्वर दशावतार मंडळातील इतर कलाकार उपस्थित होते. यावेळी कलेश्वर दशावतार मंडळाचा ‘शाप प्रतीशाप’ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. मळगाव व परिसरातील नाट्यप्रेमींनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घेतला.
मळगाव येथे कोकण नटसम्राट लोकराजा सुधीर कलींगण यांचा वाढदिवस साजरा…
