*डाक अदालतीचे सिंधुदुर्गात १७ मार्च ला आयोजन

अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने करण्यात आले आयोजन

सिंधूदुर्गनगरी ता १ अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग यांच्या वतीने दिनांक 17 मार्च 2021 रोजी सकाळी 11.00 वा. अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्गनगरी यांच्या कार्यालयामध्ये डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर आदालतीमध्ये पोस्टाच्या कार्यपद्धतीविषयी, कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे नावारण सहा आठवड्यांच्या आत झाले नाही व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असवा, जसे तारीख व ज्या अधिकाऱ्यास पाठविली असेल त्यांचे नाव व हुद्दा इत्यादी. संबंधितांनी डाक सेवेबाबतची तक्रार के.एन.बावनकुळे, अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्गविभाग, सिंधुदुर्गनगरी 416812 यांच्या नावे दिनांक 5 मार्च 2021 रोजी पर्यंत किंवा त्यापूर्वी पाठवाव्यात असे डाकघर अधीक्षक, सिंधुदुर्गविभाग हे कळवितात.

You cannot copy content of this page