कोनाळकट्टा येथे झाड पडल्याने दोडामार्ग कोल्हापूर मार्ग बंद

वाहनांच्या रांगा;रस्ता खुला करण्याचे प्रयत्न

⚡दोडामार्ग,ता१२-: कोनाळकट्टा येथे रस्त्यात झाड पडल्याने दोडामार्ग तिलारी कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.त्यामुळे रस्त्यात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.स्थानिक ग्रामस्थ झाड तोडून रस्ता खुला करण्याचे प्रयत्न करीत आहेत.
त्या परिसरात संध्याकाळी सव्वा सातच्या दरम्यान मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटला होता.त्यावेळी रस्त्यालगतचे झाड रस्त्यात कोसळले आणि त्या मार्गावरील वाहतूक बंद झाली.
गेल्या काही दिवसात रस्त्यालगतची झाडे उन्मळून किंवा तुटून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.त्यात काही जखमी होण्याचे आणि वाहनांचे नुकसान होण्याचे प्रकारही घडले आहेत.त्याचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यालगतची धोकादायक झाडे तोडून रस्ता निर्धोक बनवावा अशी मागणी तेथील सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना पांगम यांनी केली आहे.
दरम्यान,प्रसन्ना पांगम,प्रीतम पोकळे व अन्य ग्रामस्थ झाड बाजूला करून रस्ता खुला करण्याचा प्रयत्न करत आहेत.

You cannot copy content of this page