तर समीर सातार्डेकर यांची तालुका चिटणीसपदी निवड: जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र..
⚡बांदा ता.१२-: बांदा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा उर्जीतवस्था
आणण्यासाठी येथील प्रशांत पांगम यांची सावंतवाडी तालुका उपाध्यक्षपदी तर समीर सातार्डेकर यांची सावंतवाडी तालुका चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते दोन्ही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.
बांदा शहर व परिसरातील काही कार्यकर्ते हे अजित पवार गटात गेल्याने याठिकाणी पक्ष बांधणी करण्यासाठी वरील दोन्ही पदाधिकाऱ्यांना पदे देण्यात आली असून भविष्यात याठिकाणी राष्ट्रवादी अजून जोमाने वाढविण्यावर भर देणार असल्याचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी सांगितले.
