नगराध्यक्षपदाचा राजीनामा देताना बबन साळगावकर भांग पिऊन होते काय…?

प्रतीक बांदेकर ; नगराध्यक्ष पदाच्या काळात उल्लेखनीय काम दाखवा..

⚡सावंतवाडी ता.१२-: दीपकभाईच्या नावावर मिळालेलं नगराध्यक्ष पद ७ वर्ष उपभोगल्या. नंतर जनमताचा अनादर करून राजीनामा दिला होता तेव्हा आपण भांग पिऊन होता काय? असा सवाल शिंदे गटाचे युवक शहराध्यक्ष प्रतीक बांदेकर यांनी उपस्थित केला.दरम्यान साळगावकरांनी पहिल्यांदा आपलेल्या आंदण म्हणून मिळालेले नगराध्यक्ष पदाच्या काळात कोणतेही उल्लेखनीय काम केलंय ते जनतेला सांगावे नंतर मंत्री दीपक केसरकर यांच्या टीका करावी या पुढे दीपकभाई वर टीका झाली तर जसाच तसे उत्तर दिलं जाईल आसा इशारा युवासेना शहर प्रमुख प्रतीक बांदेकर यांनी दिला.

याबाबत बांदेकर यांनी प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर हे आमदार दीपक केसरकर यांच्या जीवावर निवडून आले आहेत आज ते दीपक भाई यांच्या विरोधात गेल्याने त्यांची अवस्था काय झाले आहे हे सावंतवाडीतील जनतेला माहित आहे त्यामुळे बबनराव साळगावकर यांनी देखील टीका करताना विचार करावा तसेच आमदार किंवा नगराध्यक्षाच्या निवडणुकीत त्यांना किती मतं मिळाली हे त्यांनी आत्मपरीक्षण करावे आणि त्यानंतर केसरकर यांच्या टीका करावी असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

You cannot copy content of this page