जितेंद्र आव्हाड यांनी दिली नियुक्ती
⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी हिदायतुल्ला खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना काल राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते देण्यात आले.
दरम्यान खान हे नेहमी समाजकार्य व पक्षाच्या कामासाठी तत्पर असतात. यापुढे त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची ध्येय धोरणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे, नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे.
