माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांना बंधू शोक
⚡कणकवली ता.०९-: कणकवली शहराचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची बंधू सचिन अनंत नलावडे (52) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. प्रकृती अस्वस्थमुळे त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजय, मुलगा पुतणे, तीन विवाहित बहिणी, असा मोठा परिवार आहे.
सचिन नलावडे हे कणकवली शहरात मनमिळाऊ व हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. काही दिवस त्यांनी अलंकार भोजनालय चालविले होते.आपल्या विनोदी स्वभावामुळे देखील त्यानी अनेकांशी स्नेहाचे संबंध निर्माण केले होते. त्यांच्यावर कणकवलीतील मराठा मंडळ नजीकच्या स्मशानभूमीत दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
