कोल्हापूर येथे होते उपचार सुरु ; अन्य एकावर उपचार सुरु
⚡देवगड ता.०९-: देवगड आगारातील देवगड वानिवडे प्रवासी फेरी दिर्बादेवी थांब्याजवळ आली असता शनिवारी झालेल्या अपघातामधील तेजस तुषार बांदेकर वय २५ याचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. तर तन्मय तुषार बांदेकर वय २० याच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत तेजस बांदेकर याचा निधन झाल्याची वृत्त समजतात आनंदवाडी गावासह देवगड शहरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान बेदरकारपणे वाहन चालविणे,भरधाव वेगाने वाहन हाकणे प्रसंगी मद्यप्राशन करून सेवा बजाविणे असे वाढते प्रकार प्रवाश्याच्या निदर्शनास येत असल्याने प्रवासी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.याकडे वरिष्ठ अधिकारी वर्गाने गांभीर्याने पहाणे गरजेचे आहे.
