दोघे गंभीर ; दुकानशेडचेही झाले नुकसान
⚡देवगड ता.०८-: देवगड आगाराची देवगड वानिवडे ही प्रवासी फेरी (एमएच २०बीएल ४०७८)देवगड हुन तळेबजार या मार्गावर जात असताना दिर्बादेवी थांब्याजवळ आली असता समोरील वाहनास ओव्हरटेक करीत असताना चालकाला वेगावर नियंत्रण न राखता आल्याने रा.प. बस उजव्या बाजूला जाऊन ज्यूपिटर दुचाकी(एम एच ०७ -ए एम ९१९०) गाडीला धडकली व गंभीर अपघात घडला. यात मोटासायकलस्वार व सह सोबती एकूण २ गंभीर जखमी झाले.असून नजीकच्या दुकानशेडला धडक दिल्याने शेडचेही नुकसान झाले आहे.दरम्यान नजिक असलेल्या विजेच्या खाब्याला धडक न बसल्याने मोठा अनर्थ टळला.
सदर बसमध्ये एकही प्रवाशी नव्हता पैकी कुठल्याही प्रवाशास अथवा चालक वाहकास कोणत्याही प्रकारची दुखापत अगर इजा झालेली नाही.परंतु मोटरसायकल स्वार व सहकारी याना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचाराकरिता कोल्हापूर येथे हलविण्यात आले ,घटनास्थळी स्थानिक नागरिक तसेच नगरसेवक संतोष तारी तेजस मामघाडी शरद ठुकरुल,माजी आमदार अजित गोगटे,माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर सौरभ माने व अन्य यांनी धाव घेतली तसेच आगार व्यवस्थापक निलेश लाड स्थानक प्रमुख श्रीकांत सैतावडेकर ,सहाय्यक यंत्र अभियंता संदीप पाटील यानी भेट दिली .
अपघातस्थळी देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे,पोलीस हवालदार आशिष कदम,अमित हळदणकर बिट अंमलदार राजन जाधव यांनी जाऊन रीतसर घटनेचा पंचनामा केला..
गंभीर जखमी मध्ये
तन्मय तुषार बांदेकर वय- २०रा.
२ तेजस तुषार बांदेकर वय- २५ रा. आनंदवाडी, देवगड यांचा समावेश आहे .या अपघातात दुकानशेडचे रु ५०,हजार,दुचाकी चे रु ३५ हजार,व एसटीचे रु ३०,हजारांचे नुकसान झाल्याचे समजते.या प्रवासी फेरीवर वाहक बबन ज्ञानोबा कदम हे सेवा बजवित होते.
दरम्यान या घटनेची फिर्याद तुकाराम प्रभाकर बांदेकर रा. आनंदवाडी यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून दिर्बादेवी स्टॉप नजीक रस्त्याच्या बाजूला असलेल्या टूव्हिलर ला एसटी ने भरधाव वेगाने धडक दिली असल्याचे नमूद केले आहे त्यानुसार देवगड आगारातील चालक संजय पाटील यांच्याविरुद्ध भरधाव वेगाने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालविले व दुचाकी दुकानशेड व एसटी नुकसानिस कारणीभूत ठरल्या प्रकरणी भादवी कलम २७९,३३६,३३७,३३८,४२७,मोटर अपघात अधिनियम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार राजन जाधव करीत आहेत.
