बदलत्या राजकारणाविरोधात आंदोलन
देवगड
महाराष्ट्र राज्यात होणारी बदलती राजकीय स्थित्यंतरे याबद्दल मतदारात तीव्र संताप व्यक्त होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची या विशेष उपक्रमाचे आयोजन देवगड येथे करण्यात आले होते त्या अनुषंगाने देवगड बस स्थानकासमोर उभारण्यात आलेल्या एक सही संतापाची या फलकावर शेकडो नागरिकांनी सह्या करून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल. या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे नगराध्यक्ष साक्षी प्रभू गटनेते संतोष तारी, नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी व अन्य नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन एक सही संतापाची या मोहिमेला पाठिंबा व्यक्त केला याप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री , मनसे सहसंपर्क प्रमुख संतोष मयेकर सरचिटणीस जगदीश जाधव उपाध्यक्ष राजा मोंडकर, उपाध्यक्ष महेश नलावडे ,विभाग अध्यक्ष परेश आडकर नंदकिशोर हडकर शहराध्यक्ष सचिन राणे शाखा अध्यक्ष गणेश खोत व वन्य काय आहे उपस्थित होते.
