⚡बांदा ता.०८-: श्री देव पाटेकर मंदिर इन्सुली कोठावळेबांध येथे सग्रह सवास्तु शिखर कलश प्रतिष्ठा समारंभ 10 व 11 जुलै रोजी होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी 10 रोजी श्री गणेश पूजन, पुण्याहवचन, कार्यारंभ देवता आवाहन, पूजन, हवन, कलश शुद्धी होणार आहे. मंगळवारी 11 रोजी आवाहित देवता पूजन, शिखर कलश प्रतिष्ठा, पूर्णाहुती हे धार्मिक विधी होणार आहेत. यानिमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा, महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.तर रात्री स्थानिकांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समिती व समस्त इन्सुली कोठावळेबांध ग्रामस्थांनी केले आहे.
