श्रावण नंबर 1 शाळेतील रंगभरण स्पर्धेत लीसा, प्रचिती व कार्तिक प्रथम

⚡कणकवली ता.०८-: महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 ता.मालवण या शाळेत चालू शैक्षणिक वर्षातील पहिली मासिक रंगभरण स्पर्धा संपन्न झाली. यावेळी चित्रकार श्रावी श्रीकृष्ण पराडकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले. या स्पर्धेला एकूण 42 विद्यार्थी सहभागी झाले होते.

या रंगभरण स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांना तिन्ही गटात वेगवेगळी चित्रे मुख्याध्यापक स्मिता किंजवडेकर यांनी पुरवली. या स्पर्धेतील प्रथम पाच विजेत्या स्पर्धकांना अभिजीत पवार यांच्यावतीने कै. भास्कर नारायण पवार यांच्या स्मरणार्थ भावना भास्कर पवार यांच्या सौजन्याने बक्षिसे देण्यात आली. तर उर्वरित सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना पेनं भेट देण्यात आली. विजेते स्पर्धक खालील प्रमाणे: गट पहिला इयत्ता पहिली ते दुसरी – प्रथम कार्तिक किशोर गावडे इयत्ता पहिली, द्वितीय वेदा निलेश दळवी इयत्ता पहिली, तृतीय कार्तिक अभिजीत पवार इयत्ता पहिली, चौथा क्रमांक परि प्रकाश यादव इयत्ता दुसरी, पाचवा क्रमांक पार्थ सुनील वेदरे इयत्ता दुसरी,
गट दुसरा – इयत्ता तिसरी ते पाचवी प्रथम प्रचिती प्रशांत गवस इयत्ता पाचवी, द्वितीय रेवा शिवराम परब इयत्ता चौथी, तृतीय हर्षदा समीर वेदरे इयत्ता चौथी, चौथा क्रमांक रिया प्रकाश यादव इयत्ता चौथी, पाचवा क्रमांक ऋतिका रुपेश परब इयत्ता चौथी.
गट तिसरा – इयत्ता सहावी व सातवी प्रथम लीसा भालचंद्र कुबल इयत्ता सहावी, द्वितीय भक्ती नागेश परब इयत्ता सातवी, तृतीय वैष्णवी मंगेश यादव इयत्ता सातवी, चौथा क्रमांक आर्या समीर सडेकर इयत्ता सहावी, पाचवा क्रमांक सदाशिव अनंत परब इयत्ता सातवी. या यशस्वी स्पर्धकांना देणगीदार अभिजीत पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणप्रेमी सदस्य उमेश श्रावणकर, पालक शिक्षक संघाचे सदस्य सुरेंद्र परब, किशोर गावडे आणि सर्व शिक्षकांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. श्रावण सरपंच नम्रता मुद्राळे, उपसरपंच दुलाजी परब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम परब, पोलीस पाटील धाकू दळवी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अजय परब, महात्मा गांधी तंटामुक्त गाव कमिटीचे अध्यक्ष सुधाकर मुद्राळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक स्मिता किंजवडेकर, शिक्षक विनायक हरकुळकर, शमा कडूलकर, अमित पवार, रोहिणी पवार, सुवर्ण दळवी व श्रावी पराडकर यांनी परिश्रम घेतले आहेत.

You cannot copy content of this page