राजू मसुरकर:पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली मागणी
⚡सावंतवाडी ता.०७-: जिल्हा नियोजन निधीतून सिटीस्कॅन, एम आर आय मशनरी जिल्हा सामान्य रुग्णालयासह सावंतवाडी आणि कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
या अत्याधुनिक मशीनरी खरेदीसाठी बारा कोटी रुपये निधी आवश्यक असून हा निधी जिल्हा नियोजन मधून मंजूर करावा, अशी आग्रही मागणी मसूरकर यांनी केली आहे. या मशिनरी उपलब्ध झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला एम आर आय आणि सिटीस्कॅन या सुविधा मोफत उपलब्ध होऊ शकतात, असे पुष्टी ही मागणी करताना राजू मसुरकर यांनी जोडली आहे.
