मळेवाड-आरोंदा रस्त्यावरील धोकादायक काँक्रीट उखडले

अपघात होण्याची दाट शक्यता : उपाययोजना करण्याची वाहनधारकांतून मागणी

⚡सावंतवाडी ता.०७-: मळेवाड-आरोंदा रस्त्यावर खरी येथे उतारावर पाण्याच्या पाईपलाईनसाठी रस्ता खोदण्यात आला. त्यानंतर काँक्रीटीकरण केले मात्र सद्यस्थितीत काँक्रीट उखडून त्याठिकाणी खड्डे पडले आहे. कोणताही अपघात घडण्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक तसेच ग्रामस्थांमधून होत आहे.


चार पाच दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मळेवाड-आरोंदा रस्त्यावरील खरी येथे असलेला पाईपलाईनचा चर धोकादायक ठरत आहे. ठेकेदाराने या खोदलेल्या रस्त्यावर काँक्रिट घालून रस्ता सुरळीत केला होता. मात्र यावर घातलेले काँक्रिट आता निघून त्या ठिकाणी रस्ता खचून खड्डे पडले आहेत. हे खड्डे उतरणीवर असल्याने तसेच पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असल्याने वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर पडलेले खड्डे बुजवावेत अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांकडून होत आहे.

You cannot copy content of this page