⚡कणकवली ता.०७-: विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल कणकवली येथील चतुर्थ वर्ष बी फार्मसीची विद्यार्थिनी शिवानी दत्तात्रय घोगळे हिने जी पॅट २०२३ परिक्षेमध्ये यश संपादन केले. या परिक्षेसाठी तिला जी पॅट समन्वयक प्रा. सचिन गोरड व इतर शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जगताप, बी फार्मसी विभाग प्रमुख प्रा. अमर कुलकर्णी, डी फार्मसी विभाग प्रमुख प्रा. चंद्रशेखर बाबर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.
संस्थेचे अध्यक्ष वैभव नाईक, सचिव डॉ. रमण बाणे, व्यवस्थापकीय विश्वस्त मंदार सावंत यांनीही या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले .
