मेढा कोथेवाडा येथील विद्युत कामांसाठी ३ लाखाचा निधी मंजूर

⚡मालवण ता.०४-:
आमदार वैभव नाईक यांच्या शिफारशी नुसार सिंधुरत्न योजनेमधून मालवण शहरातील मेढा कोथेवाडा येथील विद्युत पोल शिफ्ट करणे, थ्रीफेज लाईन ओढणे व स्ट्रीट लाईट बसविणे या कामासाठी ३ लाख रु. मंजूर करण्यात आले आहे.

सदर काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असून येथील वीज समस्या मार्गी लागणार आहे. माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी या कामाची मागणी केली होती. आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून या कामाला निधी मंजुर केल्याबद्दल स्थानिक नागरीकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page