⚡मालवण ता.०४-: मालवण शहरातील रेवतळे, धुरीवाडा येथील ११ केव्ही विद्युत लाईनवरील वीज समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी सदर ११ केव्ही वीज वाहिनी भूमिगत करण्यासाठी सिंधुरत्न योजनेमधून २० लाख रु. मंजूर करून घेतले आहेत. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या सुटण्यास मदत होणार असून लवकरच हे काम हाती घेतले जाणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण शहरप्रमुख बाबी जोगी, माजी बांधकाम सभापती मंदार केणी,माजी नगरसेविका दर्शना कासवकर,माजी नगरसेविका शीला गिरकर, भाई कासवकर, उमेश मांजरेकर, पॉली गिरकर यांनी सदर ११ केव्ही लाईन भूमिगत करण्याची मागणी केली होती. आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून या कामाला निधी मंजुर केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
