जिल्हाध्यक्ष राजन तेली करणार मार्गदर्शन; प्रलंबित विकास कामावर होणार चर्चा
⚡सावंतवाडी ता.०४-: तालुक्यातील भाजपा सरपंचांची उद्या श्रीराम वाचन मंदिर येथे सकाळी दहा वाजता बैठक आयोजित करण्यात आली असून यावेळी तालुक्यातील प्रलंबित विकास कामाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. ही बैठक भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या अध्यक्षतेखालील पार पडणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री. तेली यांनी केले आहे.
दरम्यान बैठकीत होणाऱ्या प्रलंबित विकास कामांच्या अडचणीच्या समस्या जाणून घेऊन येणाऱ्या दहा तारिखला डीपीडीसीच्या बैठकीत सर्व समस्या पालकमंत्र्यांच्या समोर मांडण्यात येणार असल्याचे देखील तेली यांनी यावेळी सांगितले.
