⚡वेंगुर्ला ता.२७-: ‘हाताला काम श्रमाला दाम‘ या उक्तीप्रमाणे आजच्या युगात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिया विकास होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा वाढीस लागावी. तंत्र शिक्षण हे गगना एवढं क्षेत्र आहे त्याची ओळख विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम सोबत व्हावी यासाठी दाभोली इंग्लिश स्कूल शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, दाभोली इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्य वतीने कोझ टू कनेक्ट फाऊंडेशन पुणे यांच्यावतीने तंत्र शिक्षण विभागाचा शुभारंभ दाभोलीतील जेष्ठ कारागीर श्री. मेस्त्री यांच्या हस्ते संपन्न झाला.
यू.पी.एस.सी परीक्षेत देशात ७६ वा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल शाळेच्या वतीने आय.ए.एस.वसंत दाभोलकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर, वसंत दाभोलकर, कोज टू कनेक्ट अनिरुद्ध बनसोड, प्रभाकर सावंत,शाळा व्यवस्थपन समिती अध्यक्ष सुधीर गोलतकर, मुख्याध्यापक किशोर सोनसुरकर, मिलिंद शंकर साठे, मठ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनिल जाधव, आर.पी.बागवे हायस्कूलचे मुख्याध्यापिका अर्चना कोदे, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, मुख्याध्यापक हेवळकर, राखी दाभोलकर, महेश बोवलेकर, माजी विद्यार्थी एकनाथ राऊळ, केतन खानोलकर, मयेकर, दिलीप अरावांदेकर, तंत्रशिक्षण प्रशिक्षक दत्तप्रसाद सांगेलकर, राजेश कांबळी, प्रतिक्षा पोईपकर, पांडुरंग जाधव, कदम आदी उपस्थित होते.
या शाळेमध्ये ऊर्जा आणि तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान कार्यशाळा, अभियांत्रिकी तंत्रज्ञान, बागकाम आणि शेती तंत्रज्ञान या बरोबरच शालेय विद्यार्थ्यासाठी वाचनालय व अभ्यासिका तसेच इंग्लिश कोपरा, बुद्धिबळ सराव टेबल यांचेही शुभारंभ वसंत दाभोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
दाभोली हायस्कूल तंत्र शिक्षण विभाग समन्वयक दीपक पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचलन रेश्मा चोडणकर यांनी तर आभार वसंत पवार यांनी मानले.
