⚡वेंगुर्ला ता.२७-: श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान खानोली-सुरंगपाणी येथे गुरुवार दि. २९ जून रोजी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
सकाळी ८ वा. श्रींची नित्यपूजा, सकाळी १० ते रात्रौ १२ वाजेपर्यंत विठ्ठलनामाचा गजर, दिवसभर विविध भजनांचे कार्यक्रम होणार आहेत. ज्या भजन मंडळांना याठिकाणी भजन सेवा करायची आहे त्यांनी मिलिद पंडित (९४०५४५६७१२) यांच्याशी संफ साधावा. तसेच श्रींच्या दर्शनाचा व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक प.पू.दादा महाराज पंडित यांनी केले आहे.
