वायरी गर्देरोड येथील मितेश वराडकर या तरुणाचे निधन

⚡मालवण ता.२४-: मालवण वायरी गर्देरोड येथील रहिवासी मितेश रमेश वराडकर (वय २८) याचे अल्पशा आजाराने शुक्रवारी पहाटे ४ वाजता मुंबई येथे निधन झाले. मितेश याच्या अकाली जाण्याने मालवणात हळहळ व्यक्त होत आहे.

मितेश याचा मोठा मित्रपरीवार होता. एक चांगला क्रिकेटर तसेच सर्वांमध्ये मनमिळाऊ स्वभावामुळे तो परिचित होता. आज शनिवारी वायरी येथील मोरयाचा धोंडा येथील स्मशान भूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, चार भाऊ, वहिनी, आत्या, काका, काकी असा परिवार आहे. मालवणचे माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांच्या मेहुण्याचा तो मुलगा होय तर पप्प्या, अमित, कमलेश व केबल ऑपरेटर विनायक वराडकर यांचा तो भाऊ होय.

You cannot copy content of this page