आचरा मार्गावरील बिडवाडी फाटा येथे रस्त्यावर झाड कोसळले

वाहतूक पर्यायीमार्गे वळविली; पहिल्याच पावसाचा फटका

⚡कणकवली ता.२४-: सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा जोर वाढला असून कणकवली आचरा मार्गावरील बिडवाडी फाटा येथे सकाळी 11. 45 वा. आचरा रस्त्यांवर व बिडवाडी फाट्यानजिक रस्त्यावर झाड कोसळल्याने आचरा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे.वाहतूक पर्यायी मार्गाने म्हणजेच वरवडे मार्गाने वळवावी लागली आहे.

काल पासून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.मात्र आज सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने आचरा मार्गावरील बिडवाडी फाट्यानजिक रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.झाड रस्त्यावरून हटविण्याचे काम सुरू करण्यात आले मात्र या झाडामुळे आचरा मार्गावरील वाहतूक वरवडे मार्गे सुरू करण्यात आली.

You cannot copy content of this page