चालू पावसाळ्यासाठीही नागरिक सुरक्षेसाठी टीम सज्ज
⚡सावंतवाडी ता.२४-: दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सावंतवाडीच्या सुरक्षितसाठी सामाजिक बांधिलकी नैसर्गिक आपत्कालीन व्यवस्थापन टीम सज्ज झाली आहे या टिमच्या माध्यमातून शहरांमध्ये नैसर्गिक आपत्ती द्वारे उगवणाऱ्या परिस्थितीवर मात करून तेथील परिस्थिती सुरळीत करण्याचे विनामूल्य सेवाभावी कार्य या टीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमाचे कौतुक प्रांताधिकारी पनवेकर यांनी केले आहे व यासाठी लागणारे मदत शासनामार्फत सामाजिक बांधिलकीला केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
नैसर्गिक अतिवृष्टीमुळे 24 तासात शहरांमध्ये कुठेही घटना घडल्यास ही टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन विनामूल्य मदत कार्य करणार आहे अशी माहिती सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी दिली आहे. संपर्कासाठी खालील नंबर डायल करा. रवि जाधव 9405264027 संजय पेडणेकर 7020812719 शेखर सुभेदार 9423753042 समीरा खलील 9890714614
