वैभववाडी येथे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव…

संताजी रावराणे यांचा उपक्रम;
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, मनोज रावराणे यांची प्रमुख उपस्थिती

⚡वैभववाडी ता.२३-: कणकवली, देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीचे माजी नगरसेवक संताजी अरविंद रावराणे यांच्या वतीने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी यांचा भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला. येथील महाराणा प्रतापसिंह कलादालन सभागृहात

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, जिल्हा बँक संचालक समीर सावंत, नगराध्यक्ष नेहा माईणकर, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, आयोजक संताजी रावराणे, स्नेहलता चोरगे, सीमा नानिवडेकर, प्राची तावडे, सुप्रिया तांबे, यामिनी वळवी, संगीता चव्हाण प्रदीप रावराणे, राजन तांबे, बाबा कोकाटे, उत्तम सुतार, सुभाष रावराणे, समाधान साळुंखे, प्रकाश सावंत, प्रदीप नारकर, प्रदीप जैतापकर, आशिष रावराणे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनीष दळवी म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम संताजी रावराणे हे करत आहेत. आमदार नितेश राणे यांच्यामुळे वैभववाडीला एक वेगळी ओळख निर्माण होत आहे. पर्यटन, रोजगार व रस्ते आदी सुविधा आमदार नितेश राणे यांच्यामुळेच उपलब्ध होत आहेत. वैभववाडीचे भवितव्य यापुढे देखील उज्वल असे आहे.

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी जिल्हा बँक कायम पाठीशी राहील.बँकेकडून शिक्षणासाठी लागणारा कर्ज पुरवठा केला जाईल असे दळवी यांनी सांगितले. यावेळी प्रमोद रावराणे, मनोज रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रज्जब रमदुल तर आभार अरविंद रावराणे यांनी मानले.

You cannot copy content of this page