बांदा/प्रतिनिधी
माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सदगुरू गावडे काका महाराज संस्थापीत श्री सदगुरू भक्त सेवा न्यास या संस्थेच्या वतीने जागतीक योग दिनाचे औचित्य साधुन प्राण योग साधना कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाचे उदघाटन गावडे काका महाराज यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलीत करून करण्यात आले.
यावेळी संस्थेचे खजिनदार पंकज कामत, सचीव राकेश केसरकर, विश्वस्त गौरव मुंज, श्री स्वामी समर्थ श्रध्दा भक्त सेवा न्यासचे सचीव गिरीधर गावडे, योग शिक्षक आनंद सावंत, दिलीप सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना पं.पू. सदगुरू गावडे काका आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, दिर्घायुष्याचे प्रतिक म्हणजे योग. जिवनाचे रहस्य म्हणजे योग. निरोगी जिवन जगण्याचे माध्यम म्हणजे योग. निश्चयी जिवन पुढे नेण्याच माध्यम म्हणजे योग, जिथे जिवनाच परीपुर्ण तत्व पूर्ण होत. यशवंतराव मुक्त विद्यापीठाची योग मान्यता संस्थेला मिळाली असुन संस्थेच्या माध्यमातून लवकरच माड्याचीवाडी कुडाळ येथे या विद्यापीठा मार्फत योग शिक्षक प्रशिक्षीत केले जातील.
या कार्यशाळेत मधुमेह, हृदयविकार, अस्थमा या आजारावर उपयुक्त असे संगीताच्या तालावर प्राणायाम शिकविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन योग शिक्षक आनंद सावंत यांनी केले. आभार राकेश केसरकर यानी मानले.
