मडुऱ्यात गटाराअभावी रस्त्यावरील पाणी घरात

नागरिकांच्या आरोग्यास धोका : गटाराचे बांधकाम करण्याची मागणी

⚡बांदा ता.२३-: मडुरा तिठा येथे रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले मात्र पावसाचे पाणी नाल्यात जाण्यासाठी गटार खोदण्याचा विसर सार्वजनिक बांधकाम विभागाला
पडला. परिणामी सद्यस्थितीत रस्त्यावरील पाणी नारायण परब यांच्या घरात जात असल्याने आरोग्यासह जीवितास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन रस्त्याला गटार खोदावा अशी मागणी नारायण परब यांनी केली आहे.


गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी दुपारी जोरदार हजेरी लावली. मडुरा तिठा येथे घाईघाईने रस्त्याचे काम करण्यात आले. रस्त्यावरील पाणी नाल्यात जाण्यासाठी मार्गच तयार करण्यात आला नाही. अनेक वेळा सांगूनही याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी आज रोणापाल व मडुरा गावातील रस्त्याचे पाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे घरात शिरत आहे. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस पाण्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग राहणार असल्याचे नारायण परब यांनी सांगितले.
रस्त्याचा ठेका घेण्यासाठी ठेकेदार अतिघाई करतात मात्र नागरिकांना त्रास होणाऱ्याबाबीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. तसेच काम करतेवेळी बांधकाम विभागाचा अधिकारी उपस्थित राहत नसल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होते. रस्त्याला गटार खोदणे प्रशासनाचे काम असून तात्काळ याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांमधून बोलले जात आहे.

You cannot copy content of this page