प्रेयसीच्या पतीच्या खून प्रकरणी एकाला जन्मठेप

बांदा गडगेवाडी येथे जून २०२१ मध्ये घडली होती घटना;पश्चिम बंगाल राज्यातील मूळ रहिवाशी

ओरोस ता.२२-:

पत्नी बरोबर असलेल्या प्रेम संबंधांस विरोध केला म्हणून पतीचा खून करणाऱ्या सुखदेव सोपान बारीक (वय ३०) राहणार बाजबेलेनी, ता. गोवरदंगा, जि. उत्तर २४ परगणा, राज्य पश्चिम बंगाल याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी काम पाहिले. ५ जून २०२१ रोजी बांदा गडगेवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली होती.
सावंतवाडी तालुक्यातील बांदा गडगेवाडी येथील मकरंद तोरस्कर यांचे घरी भाडयाने मयत विश्वजीत कालीपद मंडळ, वय ३४ मूळ रा. सरईपूर गोलवाघन, जि. परगणा राज्य पश्चिम बंगाल हा कामगार आपली पत्नी व दोन मुलांसह राहत होता. अपराधी सुखदेव सोपान बारीक याने ५ जून २०२१ रोजी मध्यरात्री १ वाजताचे दरम्यान विश्वजीत कालीपद मंडळ याचे घरात प्रवेश करून, त्याची पत्नी व दोन मुलांना बेडरुममध्ये कोंडून ठेवले आणि मयतास लोखंडी टिकावाने जबर मारहाण करुन त्यांचा खून केला आणि पुरावे नष्ट करुन रेल्वेने पळून गेला. या घटनेच्या आधारे बांदा पोलीस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय हुंबे यांनी सरकारतर्फे बांदा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती. त्यानुसार सुखदेव बारीक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

You cannot copy content of this page