⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी येथील एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
प्रशालेतील इयत्ता पाचवीतील कुमारी गार्गी राजेश परब व कुमार पियुष नाना शिर्के यांनी सिल्वर मेडल तसेच इयत्ता आठवीतील कुमार भाग्यम संदीप धुरी यांनी सिल्वर मेडल प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले. प्रशालेच्या या गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे गणित शिक्षक श्री एस. व्ही. भुरे तसेच श्रीमती एस. एस. दळवी, श्रीमती पी.एम. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई, सचिव श्री प्रसाद नार्वेकर, संस्थेचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन. पी. मानकर, प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, प्रशालेचे हितचिंतक यांच्यामार्फत या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
