कै उदय खानोलकर वाचन मंदिराचे काम सामाजिक बांधिलकी जपणारे

अनंत उचगावकर यांचे गौरव उद्गार

⚡बांदा ता.१२-: मळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिरने केवळ वाचन संस्कृतिशी निगडित न राहता सामाजिक उपक्रम देखील तितक्याच प्रभाविपणे राबवीत असल्याने हे सामाजिक बांधिलकी जागृत असल्याचे लक्षण आहे, असे मत नॅब संस्थेचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी केले.

श्री. उचगावकर हे मळगाव वाचनालयात आयोजित नेत्र तपासणी शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर, नॅब संस्थेचे सचिव सोमनाथ जगजिन्नी, नेत्र चिकित्सा अधिकारी सिध्दराम नागुरे, डॉ. अदिती भोसले, दीपाली कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

नेत्र तपासणी शिबीर (कै.) यशवंती धोंडू पटेकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या कन्या उज्ज्वला यशवंत खानविलकर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीराचा लाभ मोठ्या संख्येने रुग्णांनी घेतला.

यावेळी नॅब संस्थेचे सचिव श्री. जगजिन्नी यांनी नॅब संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या संचालिका स्नेहा खानोलकर यांनी केले तर आभारप्रदर्शन गुरुनाथ नार्वेकर यांनी केले. यावेळी वाचन मंदिरचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page