आगामी काळात देवगडमध्ये राष्ट्रवादीची ताकद दिसेल

२४ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात नंदकुमार घाटे यांनी व्यक्त केला विश्वास

देवगड
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी आपले मैत्रीचे संबंध असून त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची निर्मिती करून राष्ट्रहित व देशहिताने प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने जनतेची सेवा केली व त्यांच्याच कार्यामुळे आपण गेली २४ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सेवा करीत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात व राजकीय क्षेत्रात देवगड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वेगळा ठसा आपण उमटवू शकलो आगामी होणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक वेगळी ताकद देवगड तालुक्यात दिसून येईल व देवगड तालुक्यातील शेतकरी व जनतेच्या हितासाठी आवश्यक असलेली देवगड जामसंडे नळ पाणी योजना रखडलेला आनंदवाडी बंदर प्रकल्प पूर्णत्वास नेण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील अशा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदकुमारशेठ घाटे यांनी देवगड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांसमोर बोलताना व्यक्त केला.

यानिमित्ताने या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेल्या२४ वर्षाच्या जडणघडणीत देवगड तालुक्यातील ज्या कुटुंबांनी विशेष योगदान दिले त्या कुटुंबातील प्रतिनिधींचा विशेष सत्कार या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नंदकुमार शेठ घाटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

यात प्रामुख्याने ज्ञानदेव भडसाळे वळकुवाडी, अनिल तेली ,सुहास नाणेरकर, विश्वनाथ तेली निलेश पेडणेकर नागेश आचरेकर (कुणकेश्वर) या प्रमुख कार्यकर्त्यांच्या समावेश होता. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या देखील या वर्धापन दिनाच्या निमित्ताने यथोचित सत्कार करण्यात आला. देवगड तालुक्यातील पत्रकार बंधूंचे योगदाना बद्दल ज्येष्ठ पत्रकार व पुरस्कार प्राप्त पत्रकार दयानंद मांगले, यांच्या समवेत सुरज कोयंडे, गणेश आचरेकर त्यांच्याही सन्मान करण्यात आला.
: प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत पाळेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटचालीची सविस्तर माहिती देऊन आगामी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी सर्व कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे राहून शरद पवार यांचे हात बळकट करण्याकरता विशेष प्रयत्न करावेत व देवगड तालुक्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीची ताकद दाखवून द्यावी असे आवाहन केले .तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव ,,जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश पेडणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटचालीविषयी मार्गदर्शन केले.
या वेळी
तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव,तालुका सरचिटणीस शरद शिंदे,तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत पाळेकर,जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश पेडणेकर,जिल्हा कार्यकारणी सदस्य रसिका पेडणेकर,नागेश आचरेकर,रामदास पेडणेकर,जयराम कदम,सुहास नाणेरकर,युवक तालुका अध्यक्ष विनायक जोईल,विश्वनाथ तेली, अभय बापट वसंत मोहिते,शिवराम निकम,कृष्णा परब,सुधीर देवगडकर,श्याम शेडगे,,महादेव आचरेकर शहर अध्यक्ष बंटी कदम,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page