आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर महिलांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा…

मोहिनी मडगावकर यांची पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी…

⚡सावंतवाडी ता.१०-: राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर भाजप महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांच्याबाबत आक्षेपार्ह बदनामीकारक मजकूर अपलोड केला असून, त्यांना बदनाम करत त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचे काम त्यांनी केले आहे.

महिलांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सावंतवाडी महिला मोर्चा शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे यांच्याकडे केली आहे.

यावेळी मेघना साळगावकर, मिसबा शेख, साक्षी गवस, मेघना भोगते, आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page