प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भारुका
⚡ओरोस ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील वर्गासाठी व न्याय व्यवस्थेसाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडून महाराष्ट्र राज्यात प्रथमच ई फायलिंग सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होत आहे. यासाठी बार कौन्सिलने उत्कृष्ट मशीन आणि ऑल इंडिया रिपोर्टरचे पाठबळ देवून सक्षम सुरुवात केली आहे. यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र यांचे मी अभिनंदन करीत आहे. यामुळे क्लिष्ट ड्राफ्टींग व वेळकाढू पद्धत तसेच कठीण असलेले रिसर्च करण्याचे काम यावर उत्तम पर्याय मिळाला असल्याचे प्रतिपादन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भारुका यांनी बोलताना केले.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ई फायलिंग कामाचा शुभारंभ आज सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा न्यायालयात न्यायाधीश भारुका यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात संपन्न झाला. यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा अध्यक्ष ऍड मिलिंद पाटील, राज्य उपाध्यक्ष ऍड संग्राम देसाई, ऑल इंडिया बार कौन्सिल सदस्य ऍड जयंत जयवाळे, न्यायाधीश सानिका जोशी, श्रीमती व्ही एस देशमुख, श्रीमती एस के कारांडे, कोल्हापूर अध्यक्ष ऍड विवेकानंद घाडगे, ऍड गजानन चव्हाण, ऍड आशिष कुरेशी, ऍड राजेंद्र उमाप, जिल्हा उपाध्यक्ष ऍड बंड्या मांडकुलकर, ऑल इंडिया रिपोर्टरचे मुख्य समन्वयक मंदार चितळे, जिल्हा सचिव ऍड यतीश खानोलकर यांच्यासह असंख्य वकील उपस्थित होते.
