पावसाळा सुरू होईपर्यंत मोती तलावातील गाळ उपसा सुरू राहणार

पाहणी दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी मोती तलावातील गाळ उपसा करण्यात येत आहे. त्याठिकाणी स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी भेट देऊन पाहणी केली. ते म्हणाले, पाऊस सुरू होईपर्यंत शक्य तेवढा गाळ काढण्याचे कार्य सुरू राहणार आहे. जिमखाना मैदानावर गाळ टाकण्यात येत आहे. उर्वरित गाळ राजघराणे सांगेल तेथे टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

सावंतवाडी मोती तलावातील तिन मुशी बाजूकडील गाळ उपसा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जलदगतीने गाळ काढण्याचे कार्य सुरू केले आहे. त्या ठिकाणी मंत्री दीपक केसरकर यांनी सकाळीच भेट देऊन पाहणी केली.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर,प्रांताधिकारी तथा प्रशासक प्रशांत पानवेकर, तहसीलदार अरुण उंडे , अमित कामत, नगरपरीषद अभियंता शिवप्रसाद कुडपकर, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता वैभव सगरे,आबा केसरकर आदी उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, सावंतवाडी मोती तलावाचे सौंदर्य वाढविण्यासाठी नगरपरिषद, राजघराणे व शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. पाऊस कोसळेपर्यत गाळ उपसा करण्याची मोहीम सुरू राहणार आहे. तलावातील पाणी सोडले असलेतरी अजूनही पाणी आहे. पाणी असल्याने गाळ उपसा करण्याच्या मोहिमेचा वेग मर्यादा ठेवून वाढविला आहे. गाळ काढण्याचे कार्य झाल्यानंतर तलावात कारंजा, लेझर शो आदी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.
मोती तलावातील दोन्ही तलावाची पाहणी करून केसरकर यांनी प्रांताधिकारी तथा प्रशासक प्रशांत पानवेकर यांना काही बाबतीत निर्देश दिले. तसेच आक्रिटेक्चर अमित कामत यांच्याशी मंत्री दीपक केसरकर यांनी चर्चा केली.

You cannot copy content of this page