कुडाळ ता.१०-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज, १० जून २०२३ रोजी २५ व्या वर्षांत पदार्पण केले. त्यानिमित्त आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कुडाळ कार्यालयात पक्षाचा वर्धापनदिन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते पक्षध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापनदिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत , जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, महिला जिल्हाध्यक्षा अर्चना घारे- परब, भास्कर परब, बाळ कनयाळकर, प्रफुल्ल सुद्रीक, आत्माराम ओटवणेकर, निलेश गोवेकर, रूपेश जाधव, प्रज्ञा परब, दर्शना देसाई, रवींद्र चव्हाण, डॉ. संजीव लिंगवत, संग्राम सावंत, पुंडलिक दळवी, साबा पाटकर, कृष्णा बिबवणेकर, विजय वालावलकर, रेवती राणे, दिपीका राणे, देवेंद्र टेमकर, देवेंद्र पिळणकर, शिवाजी घोगळे, सूरज खान, नझीर शेख, सावळाराम अणावकर, महेश कदम, जयराम डिगसकर, धर्माजी बागकर, स्वप्नील राऊळ, सुभाष तांडेल, प्रभाकर पवार, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
