मंत्री दीपक केसरकर:प्राथमिक शिक्षक समितीला दिले आश्वासन
⚡ओरोस ता.१०-: शिक्षक भरतीपूर्वी राज्यातील अवघड क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांच्या सोयीनुसार बदली प्रक्रीया राबविली जावून त्यानंतर बदली प्रक्रीया थांबविण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध ज्वलंत प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने राज्यसरचिटणीस राजन कोरगावकर यांचे नेतृत्वाखाली शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची सावंतवाडी येथे भेट घेऊन निवेदन व चर्चा केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हासरचिटणीस सचिन मदने, सावंतवाडी कार्याध्यक्ष गोविंद शेर्लेकर उपस्थित होते.
